जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलीवर अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणाने पीडित तरुणीकडून ऑनलाईन पैसे उकळल्याचे देखील समोर आले आहे.
ग्रामीण भागातील राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची 22 वर्ष वयाची मुलगी परगावी शिक्षण घेते. त्यातून तिची या तरुणासोबत ओळख झाली होती. ओळखीतून त्याने या पीडित तरुणीला जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओच्या बळावर त्याने तिच्याकडून ऑनलाइन रक्कम उकळली. वारंवार होणा-या त्रासाला वैतागून तरुणीने आईसोबत पोलिस स्टेशन गाठत तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जळगावला वर्ग करण्यात आला आहे.