जळगाव : गांजाची मोटारसायकलने वाहतूक करणा-या तरुणास चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. कालुसिंग गोराशा बारेला (रा. महादेव ता. शिरपूर जिल्हा धुळे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलला बांधलेल्या पोत्यातून 10 किलो 600 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना समजलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गांजा, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 2 लाख 30 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल अटकेतील कालुसिंग याच्याकडून हस्तगत करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, हे. कॉ. संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जवागे, पोलिस नाईक संदीप भोई, पो. कॉ. विनोद पाटील, नीलेश वाघ व महेंद्र पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.