लॉजची रुम मिळवण्यासाठी मुलीच्या आधारकार्डचा गैरवापर – कारवाईची मागणी

On: May 30, 2025 12:47 PM

जळगाव : लॉजमध्ये तरुणीसोबत गैरकृत्य करण्यासाठी रुम मिळण्याकामी सेतु केंद्रावरील ऑपरेटरने दुस-या मुलीचे आधारकार्ड वापरल्याची तक्रार करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कारण नसतांना संबंधित मुलीची बदनामी झाल्याची देखील तक्रार तिच्या काकांनी केली आहे.

पाचोरा शहरातील एका सेतु केंद्रावरील ऑपरेटरकडे ग्रामीण भागातील एक मुलगी तिचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आली होती. ऑपरेटरने मुलीच्या मोबाईलवरील ओटीपीचा वापर करुन डुप्लीकेट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या आधारकार्डचा गैरवापर करत त्याने पाचोरा शहरातील एका लॉजवर रुम मिळवून अश्लील कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. आंतरधर्मीय प्रेमी युगलाच्या या कृत्याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खबर दिल्याने पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली.

प्रेमी युगुलांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र लॉज चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. असे असले तरी संबंध नसलेल्या मुलीच्या डुप्लीकेट आधारकार्डचा वापर झाल्याने तिची नाहक बदनामी झाली. याबाबत कारवाईची मागणी त्या मुलीच्या काकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment