बाळाला ठार करण्याची धमकी देत विवाहीतेवर अत्याचार

On: September 13, 2020 3:12 PM

कोवीड सेंटर मधील संतापजनक प्रकार
ठाणे : राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाबाधीतांवर उपचार करण्यासाठी गावोगावी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली एका विवाहितेवर लैंगीक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.

ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली असून या घटनेप्रकरणी एका 27 वर्षीय नराधम आरोपीस अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 20 वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विवाहित तरुणीने नवघर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ठाणे जिल्ह्यात मीरा रोड परिसरात असलेल्या कोविड सेंटरमधे हा प्रकार घडला. पीडित विवाहितेला 10 महिन्याच्या मुलीसोबत एका रुममधे क्वारंटाइन करण्यात आले होते.
आरोपी हा पीडित विवाहितेला गरम पाणी देण्याच्या निमीताने तिच्या खोलीत जात होता. काही दिवसांनी या नराधमाने तिच्या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.

आपल्या कुटुंबाची बदनामी होण्याच्या भितीपोटी या विवाहितेने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. अखेर अतिरेक झाल्यामुळे तिने शनिवारी नवघर पोलीस स्टेशन गाठले. तिच्या तकारीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवघर पोलिस स्टेशनचे पो.नि.संपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment