जळगाव – मानवी बुद्धीवर परिणाम करणारा उपवासाचा अमली पदार्थ विक्रेत्यास मुद्देमालासह रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. रमेश बाबासाहेब झेंडे असे राजीव गांधी नगर परिसरातून अमली पदार्थासह अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. 1.360 किलो ग्रॅम वजनाचा 13 हजार 600 रुपये किमतीचा अमली पदार्थ पोलिस पथकाने हस्तगत केला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सपोनि संदीप वाघ, सपोनि संदीप पाटील, पोउपनि संजय शेलार, हे कॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, प्रवीण भोसले, प्रमोद पाटील, पोना रेवानंद साळुंखे, पोना मनोज सुरवाडे, पोना अतुल चौधरी, पोना विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, पोशि उमेश पवार, पोशि अजिज शहा, प्रवीण सुरवाडे, दिपक वंजारी, अनिल सोननी, महिला हे कॉ आशा गायकवाड, म पो कॉ शिला गांगुर्डे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि संदीप पाटील करत आहेत.