जळगाव – पोलिस दलात महत्वाचे पद समजल्या जाणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे अधिकारी वर्गासह कर्मचा-यांच्या देखील नजरा लागलेल्या असतात. जळगाव पोलिस दलात देखील सध्या अधिकारी बदल्यांचे वारे सुरु आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन येथून एलसीबीला आलेले पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला बदली झाली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे संदीप भटू पाटील यांची एलसीबी प्रभारीपदी वर्णी लागली आहे.
बदली झालेल्या इतर अधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे – कंसात बदलीचे ठिकाण. पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर – चोपडा ग्रामीण (शनीपेठ), पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम – अमळनेर ( अमळनेर), पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे – शनीपेठ (यावल), प्रदीप ठाकुर – यावल (जिल्हापेठ), पोलिस निरीक्षक सुनिल पवार – पारोळा (नियंत्रण कक्ष), पोलिस निरीक्षक सचिन सानप – पहुर (पारोळा),
सपोनि प्रमोद कठोरे – आर्थिक गुन्हे शाखा (पहुर), सपोनि जनार्दन खंडेराव – वरणगाव (यावल), सपोनि अमितकुमार बागुल – भुसावळ बाजारपेठ (वरणगाव), सपोनि प्रकाश काळे – पिंपळगाव हरेश्वर (जळगाव शहर), सपोनि कल्याणी राजेश वर्मा – जळगाव शहर (पिंपळगाव हरेश्वर), पोउनि सोपान रमेश गोरे – पाचोरा (स्थानिक गुन्हे शाखा)







