यवतमाळ(अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील सतरा वर्षाच्या मुलीच्या विनयभंग प्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन टेकाम असे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
दि. 3 जून च्या रात्री पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपलेली असतांना संशयित आरोपी पवन पांडुरंग टेकाम याने तिच्याजवळ येत तिच्यासोबत लज्जास्पद स्पर्श करत विनयभंगाचे कृत्य केले. दरम्यान मुलीचे वडील आल्याचे समजताच त्याने पलायन केले.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जवाबानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 332(c), 74 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुशील शर्मा, साजिद खान करत आहेत.







