अकरा वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी चौघांची निवड

जळगाव:- जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षा आतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ७ जून शनिवार रोजी कांताई सभागृहात करण्यात आले होते. यातील पहिले दोन मुली व दोन मुले अशा चौघा विजयी खेळाडूंची राज्य स्पर्धे साठी निवड करण्यात आली.

स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या असून जिल्ह्यातील एकूण २९ खेळाडूंनी सहभाग घेतला. राज्य स्पर्धा दिनांक १३ ते १५ जून २०२५ या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली.

मुले – गौरव जितेंद्र बोरसे, देवांक लढ्ढा, मुली – ज्ञानवी भारंबे,भाग्यश्री सूर्यवंशी, उत्तेजनार्थ मुलींमध्ये सिया ललवाणी, हर्षिका पाटील तर मुलांमध्ये तर मुलांमध्ये श्रीराज वानखेडे, हिमांशू बाविस्कर, आर्यन अग्रवाल, युवान असावा, मृगांक पाटील,अभंग सोनवणे, आरव थेपडे, अद्विक मित्तल, ध्रुव जगताप, रणनजय सिंग राजपूत, अवनीश दलाल, यज्ञेश जगदाळे, उत्कर्ष वानखेडे, श्रावण जाधव, झेनल शेख, रियांश ललवाणी यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,नथू सोमवंशी,आकाश धनगर, संजय पाटील यांनी काम केले.

पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख,जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील, पद्माकर करणकर,रवींद्र धर्माधिकारी, नथु सोमवंशी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here