घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना हे पहिल्यांदाच घाटंजी येथे भेटीवर आले होते. त्यांनी घाटंजी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभागातील विविध कामांचा आढावा घेतला. यात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची आढाव्या सभेत अग्रीटॅक योजनेत ज्या गावाचे काम कमी आहे अशा गावातील तलाठी, कृषी सहाय्यक यांना तात्काळ कामाचा लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतक-यांना प्रवृत्त करणे ही मोहीम जिल्हाधिकारी यांनी हाती घेतली आहे. घाटंजी तालुक्यातील अद्याप कृषी विभागात एकाही गावाचा प्रस्ताव आला नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी देताच संबंधित सर्व कृषी सहाय्यक यांना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी चांगलेच फरकटले. घरकुल कामे तात्काळ पूर्ण करण्याची सूचना ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आली. तसेच येणाऱ्या मान्सून कालावधी मध्ये सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत निवडणूक पुर्व तांडे, वस्ती यांना नवीन महसुली गांवे निर्मीतीचा प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या. वृक्षारोपणचे लक्षांक पूर्ण करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबात सर्व्हेक्षण करुन त्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनेत जोडणे, आपले सरकार सेवा केंद्राना भेटी देऊन नवीन दरफलक लावणे, पेंडीग कामाच्या बाबती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना या वेळी चांगलेच फटकारले. पाण्याचे नमुने घेऊन ते तात्काळ पूर्ण करावे अशा सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन नवीन इमारत बांधकामाची पाहणी केली.
यावेळी पांढरकवडा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अमित रंजन, प्रभारी तहसीलदार अरुण भिसे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ भोसीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. धांडे, तालुका कृषी अधिकारी समृद्धी वांगसकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोड, सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना नानोटे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अरुण शास्त्रीकार, तालुका पशुधन अधिकारी डॉ. रायबोले, घाटंजीचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे, निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार विरेंद्र सोळंके, बालविकास प्रकल्प अधिकारी विक्रांत राऊत, कृषी मंडळ अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक निलेश कुंभारे आदीं उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ठिक नसल्याचे सांगितले.