रेतीचे जप्त ट्रॅक्टर पळवणा- या दोघांविरुद्ध गुन्हा

On: June 8, 2025 6:22 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तहसील कार्यालयाच्या महसुल पथकाने रात्र गस्तीवर असतांना सात हजार रुपये किंमतीची एक ब्रास रेती ट्रॅक्टरसह रामनगर जवळ पकडली. या कारवाईत पकडलेले रेतीचे ट्रक्टर पळवुन नेल्या प्रकरणी चालक शेखर हनुमंतू येडमे (वय ३०, रा. रामनगर ता. घाटंजी) व विवेक गणेश चौधरी (वय २४, रा. रामनगर ता. घाटंजी) या दोघांविरुद्ध पारवा मंडळ अधिकारी आकाश माणिकराव बेलसरे (वय ५२, रा. पारवा) यांच्या तक्रारीवरुन पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपराध क्रंमाक ०३३२/२०२५ अन्वये भारतीय न्याय सहिंता कलम ३०३ (२), २२१, ४९ व ४८ (८) अंतर्गत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार लखन राठोड (पारवा) पुढील तपास करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment