तलवार व कोयत्यासह दहशत माजवणारा ताब्यात

On: June 9, 2025 11:06 PM

जळगाव – हातात तलवार व कोयत्यासह फिरुन बोदवड परिसरात दहशत माजवणा- यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पुरुषोत्तम श्रावण वंजारी असे अटक करण्यात आलेल्या बोदवड येथील तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातील तलवार आणि कोयता हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना समजलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पो.उप.निरी शरद बागल, पोहेकॉ/प्रिंतम पाटील, रविंद्र चौधरी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील पुरुषोत्तम वंजारी यास पुढील कारवाईकामी बोदवड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment