नाशिक – मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भूमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोल डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सुनिल उर्फ सोनू जयशंकर तिवारी (रा. काका ढाब्याजवळ, कल्याण जि. ठाणे), कथुरायण उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (रा. म्हाडा कॉलनी, गौतम नगर, गोवंडी, मुंबई), मोहम्मद मकसूद अब्दुल वाहीद शेख (रा. गोवंडी मुंबई), इरफान याकुब मोमीन (रा. जमधाडे चौक, मनमाड जि. नाशिक), काकासाहेब शिवराम गरुड, रा. अनकवाडे ता. नांदगाव जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. वाहीद सदार सैय्यद (रा.इंडीयन ऑईल नगर, गोवंडी मुंबई), याकुब शेख आणि अमजद कुरेशी (मुंबई) अशा तिघांची देखील या गुन्ह्यात नावे निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर आहेत.
मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत नांदगाव तालुक्यातील अनकवाडी शिवारात मुंबई मनमाड बिजवासन चॅनेज जवळ पेट्रोल डिझेलची चोरी करुन त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने पाईप लाईनला क्लॅम्प बसवून छिद्र केल्याचा प्रकार मे महिन्यात उघडकीस आला होता. बी. पी. सी. एल. इंस्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मनमाड शहर पोलीस स्टेशन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील सुनिल उर्फ सोनू जयशंकर तिवारी याच्याविरुद्ध शाहू नगर पोलीस स्टेशन मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. इरफान याकूब मोमीन याच्याविरुद्ध निफाड तसेच मनमाड शहर पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत.
मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ, हे कॉ राजेंद्र केदारे, पंकज देवकाते, प्रल्हाद सानप, अशोक व्यापारे, पोकॉ संदीप झाल्टे, रणजीत चव्हाण, पोका राजेंद्र खैरनार, विश्लेषण शाखेचे हे कॉ हेमंत गिलबिले, पोना प्रदिप बहीरम यांनी विशेष कामगिरी करुन गुन्हा करणा- या टोळीस अटक करुन गुन्ह्याची उकल केली आहे.