जळगाव : तलवार बाळगत दहशत माजवणा-या धिरज दत्ता हिवराळे या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जळगाव शहरातील सम्राट कॉलनी भागातून त्याला तळवारीसाह अटक करण्यात आली.
हातात तलवार बाळगत रस्त्यावर आरडाओरड करत तरुण दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पो.उप.नि. शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे, रविंद्र कापडणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.