गोडाऊन मधील 35 लाख रुपयांच्या मालाची चोरी उघडकीस

On: June 19, 2025 6:13 PM

जळगाव : इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फ्रिज, वाशिंग मशीन, ए सी, इलईडी टिव्ही असा एकुण 35 लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी उघडकीस आली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन आणि भुसावळ तालुका पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केला.

नंदलाल मिल्कीराम मकडिया या व्यावसायिकाचे भुसावळ येथील महामार्गालगत गायत्री नगर राजस्थान मार्बलनजीक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे गोडाऊन आहे. त्यांच्या पत्री गोडाऊनचे शटर उचकवून चोरट्यांनी त्यातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फ्रिज, वाशिंग मशीन, एसी, इलईडी टिव्ही असा एकुण 35 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. 15 व 16 जूनच्या रात्री दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 295/2025 भा. न्या. सं. कलम 305 (अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीचा मुद्देमाल शिरपुर शहरातील करवंद रोडवरील एका खासगी गोडाऊन मध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात तसे निष्पन्न झाले.

पंचांसमक्ष पंचनामा केला असता 18 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचा मुद्देमाल ठेवण्यात आलेल्या गोडाऊनचे शिरपूर येथील मालक मुजावर जामील शेख चांद, जफर शेख मुजावर या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोहेकॉ उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ संदीप धनगर, पोकॉ सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा, एलसीबी पथकातील फौजदार शेखर डोमाळे, सहायक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ संदीप चव्हाण, पोहेकॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ महेश चौधरी, पोकॉ राहुल भोई आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment