जळगाव जिल्ह्यात खूनाच्या दोन घटना उघडकीस

On: June 23, 2025 12:21 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल व जामनेर तालुक्यात खूनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलिस स्टेशन हद्दीत कसबा पिंप्री या गावी दारुडया तरुणाच्या त्रासाला वैतागून त्याच्याच वडीलांनी त्याचा खून केला. शुभम धनराज सुरडकर (25)असे कसबा पिंप्री येथील मयत तरुणाचे नाव आहे. यावल तालुक्यातील मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहीरीत आढळून आला. यावल तालुक्यात निलंबित पोलिसाने दोघा अल्पवयीन मुलांच्या मदतीने साहिल शब्बीर तडवी (19) या तरुणाला विहिरीत ढकलून दिल्याचे उघडकीस आले आहे.

शुभम सुरडकर हा मद्यपान करुन घरी आल्यावर आपल्या घरातील सदस्यांना त्रास देत असे. त्याच्या नेहमीच्या त्रासाला त्याचे वडील धनराज सुरडकर हे मोठ्या प्रमाणात वैतागले होते. 21 जून रोजी शुभम घरात निद्रावस्थेत असतांना धनराज सुरडकर यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गावापासून लांब अंतरावर रस्त्याच्या बाजूला टाकून दिला. गुन्हा उघडकीस आल्यानंतर शुभमचे मारेकरी त्याचे वडील धनराज सुरडकर यांच्याविरुद्ध फत्तेपूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल तालुक्यातील मोहराळा येथील घटनेत साहिल शब्बीर तडवी हा तरुण गेल्या 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली होती. मिसिंगचा तपास सुरू असतांना 20 जून रोजी वड्री गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. विहीरीत आढळून आलेला तरुण साहिल याच्या आत्याचा पती व निलंबित पोलिसकर्मी अयुब हसन तडवी यानेच दोघा अल्पवयीन मुलांच्या मदतीने साहिल याची विहिरीत ढकलून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार झाला असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment