रेशनच्या धांंन्याबाबत संवादाची क्लिप व्हायरल

जळगाव : पिवळे रेशन कार्ड धारकास सुरु असलेला धान्य पुरवठा अचानक बंद झाला. सरकारी नियमानुसार मिळणारे धान्य बंद झाल्यामुळे वैतागलेल्या संबंधीत रेशनकार्ड धारकाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांचेशी फोनवर संपर्क साधत आपली व्यथा मांडली.

या संवादाची ऑडीओ क्लिप सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. या ऑडीओ क्लिप मधे तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या नावाचा उल्लेख आला आहे. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी आपणास अपशब्द वापरले असल्याचा आरोप संबंधीत रेशनकार्ड धारकाने दिपककुमार गुप्ता यांचेशी फोनवर बोलतांना कथन केला आहे. अपशब्द वापरण्याचा हा प्रकार मार्च महिन्यातील असल्याचे कथित, संबंधीत रेशनकार्ड धारकाचे म्हणणे आहे.

तहसीलदार वैशाली हिंगे यांनी संबंधीत व कथित रेशनकार्ड धारकास अपशब्द वापरल्याचा पुरावा उपलब्ध नसला तरी रेशनकार्ड धारकाच्या हितासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे समजते. मात्र तहसीलदार वैशाली हिंगे संबंधीत कथित रेशनकार्ड धारकास खरोखर असे काही बोलल्या असतील तर ते देखील योग्य नसल्याचे म्हटले जात आहे.
ऐका काय आहे तो संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here