आजचे राशी भविष्य (14/09/2020)

On: September 14, 2020 8:52 AM

मेष
मित्रांकडून संध्याकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. फावल्या वेळेचा आज सदुपयोग कराल.

वृषभ
पैसे गुंतवताना घाईगर्दीत कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्या प्रयत्नशील वृत्तीमुळे मित्रपरिवार तुमचे कौतुक करेल.

मिथुन
हाती घेतलेल्या नविन कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता आहे. अमर्याद उत्साह तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो.

कर्क
आज तुमची तब्येत उत्तम असेल. प्रवासाला जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची योग्य ती काळजी घ्या.

सिंह
आज तुम्ही आपल्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जावू शकतात. मात्र तुमचे अधिक धन खर्च होण्याची देखील शक्यता आहे.

कन्या
बाहेरगावचा प्रवास फारसा आरामदायी नसला तरी त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत होवू शकते.

तुळ
दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरा होण्याची देखील शक्यता आहे.

वृश्चिक
सामाजिक जीवनासोबतच आपले आरोग्य देखील तेवढेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ मौल्यवान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महत्वाच्या वेळेचा योग्य तो उपयोग करावा.

धनु
आपल्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. परिस्थिती नियंत्रणात कशी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मकर
आज कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी विशेष करणार आहात. दिवसा झालेला वाद सायंकाळी मिटू शकतो.

कुंभ
आर्थिक व्यवहाराची शिस्त महत्वाची ठरेल. सावधानता, संयम व शिस्त यांचा समन्वय दिर्घकाळ आवश्यक राहील.

मीन
चांगला काळ नेहमीच टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा ध्वनीलहरींप्रमाणे बदलत असतात. व्यावसायिकांना आज चांगला दिवस आहे. अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे.

.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment