जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करणा-या कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणा-या लिपिकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामलाल निवृत्ती पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
पिडीत कर्मचारी महिला आणि वरिष्ठ लिपिक पवार ही दोघे एकाच विभागात कार्यरत आहेत. लिपिक गेल्या वर्षभरापासून तिला एनकेन प्रकारे त्रास देत होता. तिच्या स्त्री मनाला लज्जा निर्माण होणारे संदेश तो तिच्या मोबाईलवर पाठवत होता. सेवा पुस्तिका भरण्यासाठी तो तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. अखेर वैतागून पिडीत कर्मचारी महिलेने त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.