महाराष्ट्र पोलीस दलात 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

On: July 8, 2025 10:47 AM

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात राज्यातील 22 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासन आदेश काढण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका समोर असतांना या बदल्या झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यात या बदल्या झाल्या आहेत. विजय लगारे यांची मुंबई शहरात पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस उपायुक्त म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. नागपूर, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख ठिकाणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेल्या अधिका-यांची नावे व पदस्थापनेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. विजय लगारे – पोलीस उपआयुक्त, मुंबई, गणेश इंगळे – पोलीस उपायुक्त, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे, कृष्णात पिंगळे – अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे (पदोन्नती), मंगेश चव्हाण – अपर पोलीस अधीक्षक, लातूर, अभिजीत धाराशिवकर – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर, पद्मजा चव्हाण – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल अहिल्यानगर, विजय कबाडे – पोलीस उपायुक्त, नागपूर (मुदतवाढ), योगेश चव्हाण – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

अशोक थोरात – अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अमोल झेंडे – दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण, दीपक देवराज – पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क, ठाणे (मुदतवाढ), सागर पाटील – सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा विभाग, मुंबई, स्मिता पाटील – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, मुंबई, जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे

सुनील लांजेवार – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर, जयश्री गायकवाड – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर, रत्नाकर नवले – पोलीस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर, प्रशांत बच्छाव – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक, नम्रता पाटील – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे, अमोल गायकवाड – अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा

पियुष जगताप – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूर, बजरंग बनसोडे – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर, ज्योती क्षीरसागर – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर, सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment