अज्ञात मयताची ओळख पटवण्याचे आवाहन

On: July 9, 2025 11:30 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत वघारा टाकळी वाघाडी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मयताचे वय अंदाजे पस्तीस वर्ष असून त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळया रंगाची पॅन्ट आहे. 

पोलीस पाटील सौ. उज्ज्वला सुदर्शन सवाईवार यांनी पारवा पोलिस स्टेशनला खबर दिली. मृतदेह घाटंजी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे (८७७९६२९७६६) अथवा पो. हे. काॅ. सुरेश येलपुलवार (९८२२८५३९८५) यांच्याशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment