प्रशांत शेंडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

On: July 11, 2025 11:42 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : युवा महाराष्ट्र फाउंडेशन आणि आनंदी युनिव्हर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील प्रशांत तुळशिराम शेंडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२५ देण्यात आला आहे. पुणे येथे हा कार्यक्रम उत्साहात झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

अभिनेत्री सोनाली कुळकर्णी तसेच डॉ. अविनाश सरकुंडे, गणेश विटकर, आनंदी युनिव्हर्स फौऊडेशन पुणे आणि इतर प्रमुख मंडळींना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशांत तुळशिराम शेंडे यांचा शैक्षणिक क्षेत्रात संशोधक अभ्यासक विद्यार्थी म्हणून दाखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात झाला.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ भूगोल विभाग आणि इतर कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय यवतमाळ, मानवता विकास बहुउद्देशीय संस्था सायतखर्डा, ता. घाटंजी, श्री. दत्त गुरु बचत गट सायतखर्डा ता. घाटंजी, ज्ञानप्रकाश बहूउद्देशीय समाजसेवी संस्था (महाराष्ट्र राज्य) आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment