घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : समाज घडवणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेला काळीमा फासणारी घटना घाटंजी तालुक्यातील अंजी नाईक येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दि. ९ जुलै २०२५ रोजी उघडकीस आला आहे. या घटनेने घाटंजी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वसंत रामभाऊ पत्रे असे या शिक्षकाचे नाव असून तो सध्या फरार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. संबंधित शाळेतील पीडित विद्यार्थिनीने या शिक्षका विरुद्ध मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती. शिक्षकांच्या वारंवार होणा-या चुकीच्या स्पर्शाने पिडीता वैतागली होती. घाटंजी पोलिस ठाण्यात संशयित शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ व बाल लैंगिक अत्याचार ८, १२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील शर्मा पुढील तपास करत आहेत.