जळगाव : वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्था जळगाव, व्हाईट लोटस मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव, ॲग्रेरियन कन्सल्टन्सी अँड सर्विसेस एलएलपी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पौर्णिमेनिमित्त साठ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम प्रतिभा प्राथमिक विद्या मंदिरात घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भोकरे, अनंत जोशी, शंकर पाटील, पवन येपुरे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मॅडम मनीषा यांनी केले. मुख्याध्यापक बाळू बाविस्कर, संजयसिंग पाटील, वैशाली चंदनकर, छाया पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद भोपे, सचिन कानडे, सागर जोशी, अजय गोमाणे यांचे सहकार्य लाभले.








