कर्ज वसुलीची रक्कम हिसकावणारे ताब्यात

On: July 16, 2025 8:05 PM

जळगाव – ग्रामीण भागातील कर्ज वसुलीची रक्कम जमा करून ती बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या रिकव्हरी प्रतिनिधीकडून हिसकावून पळून जाणाऱ्या चौघा चोरांना भडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. गोपाल संजय पारधी, मयुर ज्ञानेश्वर साळुंखे, अनुल नाना पाटील, कैलास वाल्मिक पाटील अशी त्यांची नावे आहेत. 

विक्की विठोबा पाटील हा एरंडोल तालुक्यातील रहिवासी तरुण इंडसइंड बँक लिमिटेड भारत फायनान्स कंपनीत फिल्ड  मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते रिकव्हरी करुन तो त्याच्या मोटार सायकलने पथराड येवून गोडगांव मार्गे चाळीसगांव येथे ऑफीसला जात होता. त्यावेळी त्याला पाठीमागून जोरात आवाज आल्याने त्याने दचकून मोटरसायकल थांबवली होती. मागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्याला शिवीगाळ करून लाथ मारून खाली पाडले होते. त्याच्या मोटरसायकलची चावी काढून फेकून देत त्याच्याकडे असलेल्या बॅगेतील 58 हजार 400 रुपये रोख, पाच हजार रुपये किमतीचा टॅब, दोन हजार रुपये किमतीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण 65 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून नेला होता. या घटने प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे या गुन्ह्याचा तपास करत होते. 

तपासाअंती या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून बायोमेट्रिक मशीन, टॅब आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल, दहा हजार रुपये रोख व काही कागदपत्रे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोहेकॉ किशोर सोनवणे, निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोकॉ प्रविण परदेशी, सुनिल जयसिंग राजपुत, संदीप सोनवणे आदींनी या तपास कामे सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment