गेल्या आठवड्यात जोरदार घसरणीनंतर सोने -चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. चांदीच्या भावात देखील 0.6 टक्क्यांची वाढ झाली असून तो भाव 68,350 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या महिन्यात 56,200 विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 5,000 रुपयांची घसरण झाली असल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारपेठेत स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 1,941.11 डॉलर एवढे होते. त्याच वेळी इतर मौल्यवान धातू, चांदीचे भाव कमी झाले होते. चांदी 0.3 टक्क्यांनी कमी होवून 26.68 डॉलर प्रति औंसवर आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांच्या निर्णयापूर्वीच शनिवार व रविवारच्या पुर्वी सोन्याचे गुंतवणूकदार सतर्क होते. 15 ते 16 सप्टेंबर रोजी होणा-या अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या दोन दिवसाच्या धोरण बैठकीवर सुवर्ण व्यापारी लक्ष केंद्रित करणार आहेत.
सन 2013 नंतर ग्राहकांना फिजिकल सोन्याशिवाय इतर पर्यायांमध्ये रस दाखवण्यात आला. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांकडे फिजिकल सोन्याव्यतिरिक्त पेपर सोन्यात गुंतवणूकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर सोन्यात गुंतवणूक करत लोकांना सुवर्ण डिलिव्हरीचा पर्याय देखील मिळत आहे. गुंतवणूकदारांव्यतिरिक्त पेटीएम गोल्ड, सॉवरेन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ यांसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा सामान्य लोक लाभ घेत आहेत.