जळगाव : जळगाव जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. एरंडोल तालुक्यातील कासोदा आणि जळगाव तालुक्यातील कानळदा या दोन ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या आहेत. कासोदा पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा येथील भवानी नगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ईश्वर सुकलाल महाजन, अक्षय राजेंद्र शिंपी, प्रविण आत्माराम पाटील, कैलास निंबा चौधरी, गणेश प्रकाश मराठे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 13750 रुपये रोख व 1,30,000/- रुपये किंमतीच्या तिन मोटार सायकली असा एकुण 1,43,750/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार पोहेकॉ नरेंद्र गजरे, पोना प्रदिप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, निलेश गायकवाड, दिपक देसले, कुणाल देवरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ राकेश खोंडे करत आहेत.
जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाणा शिवारातील हरीकृष्ण नगरात कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी तिन पत्तीचा रंग परेल नावाचा हार- जित जुगाराचा खेळ जितेंद्र रामचंद्र कदम याच्या संमतीने सुरु होता. संजय जनार्दन सपकाळे (रा.शिवाजी नगर, क्रांती चौक, जळगाव) व मयुर कैलास भावसार (रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) हे तिन पत्तीचा रंग परेल नावाचा हार- जितचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवतांना आढळून आले. रोख रुपये 2,14,050 व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुका पोस्टे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकातील अधीनस्त ग्रेड पोउपनि शामकांत मोरे, हे.कॉ. रामकृष्ण वासुदेव इंगळे, पोहेकॉ धनराज पाटील, पोहेकॉ दिपक चौधरी, पोना नरेंद्र पाटील, पोकॉ अभिषेक पाटील, पोकॉ तुषार जोशी, मपोहेकॉ ज्योती साळुंखे, पोकॉ तुषार शाम जोशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.





