अश्लिल व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी डॉक्टरला दोन कोटीची मागणी वजा धमकी

On: July 25, 2025 10:27 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथील एका डॉक्टरला त्याचे अश्लिल व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी एका निनावी चिठ्ठीद्वारे अज्ञाताने केली आहे. तो व्हिडीओ, फोटो व्हायरल न करण्यासाठी दोन कोटी रुपयांची देखील मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधीत डॉक्टरने पोलिस स्टेशनला धाव घेत त्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्या अर्थी त्या डॉक्टरला दोन कोटी रुपयांची मागणी तो अज्ञात करत आहे त्या अर्थी तो डॉक्टर नक्कीच त्या प्रमाणात धनिक असावा आणि त्याचा व्हिडीओ देखील तेवढाच प्रभावी असेल असा एक तर्क पाचोरा शहरात लावला जात आहे. तो वजनदार डॉक्टर कोण असावा, पाचोरा शहरात बडे दवाखाने कोणते आहेत? असे एक ना अनेक संशयरुपी प्रश्न पाचोरा शहरातील जनतेच्या मनात घर करत आहेत.

या डॉक्टरच्या एका सहका-याच्या मोबाईलवर “या प्रकरणी हस्तक्षेप करु नको” असा मेसेज आला. तो मोबाईल कुणाचा आहे याबाबत तपास सुरु असून त्या चिठ्ठ्या देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. लवकरच त्या अज्ञाताचा, मोबाईलचा  शोध लागेल असे म्हटले जात आहे. त्या अज्ञाताचा चेहरा समोर आला तरी बदनामीचा विचार करुन डॉक्टरचे नाव जगासमोर येणार नाही असे म्हटले जात आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment