न्युड कॉल्ससाठी महिलेला पाडले भाग – खंडणीखोर पित्रा पुत्र निघाले महाभाग

On: July 27, 2025 10:35 AM

जळगाव : भुसावळ शहरातील एका महिलेला तिच्याच मुलाच्या मित्राने जीवे ठार करण्याच्या धमकीचा आधार घेत न्युड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. रेकॉर्ड केलेला तो न्युड व्हिडीओ कॉल प्रसारीत करण्याची नव्याने धमकी देत तिच्याकडून जवळपास आठ ते दहा लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला या मुलासह त्याच्या पित्याविरुद्ध देखील विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेस गेल्या डिसेंबर 2024 पासून संशयीत पिता पुत्राने खंडणी मागणीचे कॉल केल्याचे समजते. पिडीतेने तिच्या मुलाच्या मित्राच्या वडिलांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी देखील तिला व तिच्या मुलाला धमकी दिली. दोघांविरुद्ध खंडणी, धमकी, विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा अशा विविध कलमाखाली दाखल गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment