मेष : जुन्या कामातून यशप्राप्ती होईल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.
वृषभ : नव्या ओळखीतून लाभ होण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीची भेट घडण्याची शक्यता आहे.
मिथुन : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्या.
कर्क : चंचलता कायम राहील. जास्त विचार करणे चुकीचे ठरु शकते. महत्त्वाची कामे आज शक्यतो टाळा.
सिंह : प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. अति कामामुळे थकवा जाणवू शकतो. मधूर वाणीने मान मिळवाल.
कन्या : रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. मन प्रसन्न राहील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील.
तूळ : कौटुंबिक वातावरण समाधानी राहील. आनंदाचा अनुभव घ्याल. धनलाभाचे योग आहेत.
वृश्चिक : नवीन खरेदी करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अति घाई व आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
धनू : तुमच्या कामाचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. सासरकडून धनलाभाचे योग आहेत. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मकर : धार्मिक कार्यात रुची वाढेल. जोडीदाराच्या कलेकलेने काम करा. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.
कुंभ : खेळासह कलेत मन रमेल. अति भावुक होणे चुकीचे ठरु शकते. पराक्रमाला उत्तम वाव आहे.
मीन : आरोग्यात योग्य ती सुधारणा होईल. कामात स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस आनंदात निघून जाईल.