जुगार अड्ड्यावरील छाप्यात 15 जणांविरुद्ध कारवाई

On: August 5, 2025 10:17 PM

जळगाव : कासोदा पोलिस स्टेशनच्या पथकाने केलेल्या कारवाईत जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पंधरा जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. जवखेडे सिम गावात गालापुर रस्त्यालगत सुरु असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला पत्त्याचा डाव रंगला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 6 हजार 390 रुपये रोख व एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली असा एकुण 1 लाख 21 हजार 390 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पो काँ दिपक देसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अटकेतील पंधरा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनु धाकु भिल, विरभान श्रावण भिल, राहुल संतोष सोनवणे, प्रविण वंसत सोनवणे, संतोष माधव सोनवणे, सुनिल दगा ठाकरे, मंगिलाल भाईदास चव्हाण, रतन धाकु भिल, अशोक गोविंदा पाटील, सचिन बापु पवार, कांतीलाल महादु सोनवणे, उत्तम बालाआप्पा जेढे, समाधान बापु पाटील, संभाजी महारु पाटील, सुनिल सिताराम वाघ (सर्व रा. जवखेडे सिम ता.एरंडोल जि.जळगाव) अशी कारवाई करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.  

पोलिस उप अधिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या पथकातील पो.ना. प्रदिप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, पोकॉ निलेश नाना गायकवाड, पोकॉ योगेश अरुण पाटील, पोकॉ कुणाल देवरे, पोकॉ दिपक देसले, पोकॉ लहु हटकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment