जळगाव एलसीबीची जुगार अड्डयावर कारवाई

On: August 9, 2025 5:33 PM

जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील हरिविठ्ठल नगर भागातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकुण नऊ जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह मोटरसायकल, मोबाईल असा एकुण 3 लाख 14 हजार 340 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील नऊ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला जुगार प्रतिबंधक कायदा 1887 चे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह हे.कॉ.अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील, पोकॉ रविंद्र कापडणे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment