नाकाबंदी दरम्यान चाळीस किलो गांजा जप्त

On: August 11, 2025 6:22 PM

जळगाव : नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगात जाणा-या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला असता त्यात चाळीस किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांच्या या कारवाई दरम्यान वाहन चालक फरार होण्यात यशस्वी झाला. चारचाकी वाहन आणि गांजा असा एकुण विस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदार पोहेकाँ सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ सत्यवान बाबुराव पवार, पोकाँ किशोर देविदास भोई, होमगार्ड निखील चौधरी आदी धरणगाव शहरातील अमळनेर चौफुली परिसरात रात्रीच्या वैली नाकाबंदी करत होते.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्याने एक मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने जात होती. या संशयीत कारला पोलिस पथकाने थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिस पथकाच्या इशा-याकडे दुर्लक्ष करत कार धरणगावच्या शहरात व त्यानंतर पुन्हा मागे वळवून पारोळा रस्त्याने नेली. पोहकाँ सुधीर चौधरी व पोकाँ किशोर भोई यांनी भरधाव कारचा पाठलाग केला असता ती पारोळा रस्त्यावरील एका झाडाजवळ आडोशाला उभी होती, मात्र त्यातील चालक फरार झाला होता. पोहेकाँ सुधीर आनंदा चौधरी, सत्यवान बाबुराव पवार, पोकाँ किशोर देविदास भोई यांनी त्या कारची तपासणी केली असता त्यात 10 लाख10 हजार 600 रुपये किमंतीचा 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पालापाचोळा असलेला गांजा आढळून आला.

पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी फॉरेंसिक टीमला पाचारण केले. रितसर कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर ती कार गांजासह पुढील तपासकामी जप्त करण्यात आली. MH 01 DP 0252 या क्रमांकाच्या त्या कारचालकाविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या नेतृत्वातील पोलीस उप निरीक्षक संतोष पवार, पोहेकाँ सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ सत्यवान पवार, पोहेकाँ राजु पितांबर पाटील, पोकाँ किशोर देविदास भोई, चंदन विष्णु पाटील, पोकाँ सुमित बाविस्कर, पोकाँ संदीप पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास फौजदार संतोष काशिनाथ पवार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment