जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

On: August 12, 2025 12:58 AM

जळगाव – जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर येथे घडली. या घटनेमुळे जामनेर येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुलेमान रहीम खान पठाण असे जमावाच्या मारहाणीत मरण पावलेल्या बेटावद खुर्द येथील तरुणाचे नाव आहे. हा तरुण जामनेर येथे एका सायबर कॅफे मधे आला होता. 

जमावातील अज्ञात तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर देखील तरुणांच्या टोळक्याने त्याचा पाठलाग करत त्याच्या गावी, बेटावद खु. येथे जाऊन त्याला पुन्हा मारहाण केली. घरी आल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला. यावेळी चिडलेल्या जमावाने मध्यस्तीसाठी पुढे आलेल्या सुलेमानच्या आई – वडिलांना देखील जुमानले नाही असे म्हटले जात आहे. या वादाचे नेमके कारण तपासले जात आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी  जामनेर पोलीस स्टेशनला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत परिस्थिती वर नियंत्रण आणले. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment