सोन्याचे दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस

On: August 13, 2025 11:51 AM

जळगाव : जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील सोन्या चांदीच्या दुकानातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. देऊळगाव गुजरी येथील हरिओम ज्वेलर्स या दुकानात घडलेल्या घटनेप्रकरणी फत्तेपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्राहकाच्या रुपात आलेल्या दोघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध चेतन नंदकिशोर विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गु.र.नं 144/2025 बीएनएस कलम 305 (अ), 3(5) प्रमाणे दाखल असलेल्या या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोउपनि रविंद्र नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चालक पोकॉ महेश सोमवंशी आदींनी या गुन्ह्याचा तपास सक्रीय केला होता.  

घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करुन तांत्रिक विश्लेषणा दरम्यान या गुन्ह्यात सुरुवातीला एका अल्पवयीन मुलास निष्पन्न करण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता या गुन्ह्यात त्याचे मध्य प्रदेशातील दोघे साथीदार सहभागी असल्याचे त्याने कबुल केले. पुढील कारवाईकामी त्या अल्पवयीन मुलाला फत्तेपूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment