सुलेमान हत्या प्रकरणातील पिडीत परिवारास फारुख शेख यांची भेट

On: August 15, 2025 11:25 AM

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान शेख या तरुणाचा मॉब लिचींगच्या अमानुष घटनेत मृत्यु झाला. एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी या घटनेतील पिडीत परिवाराची आपल्या शिष्टमंडळासह भेट घेत सांत्वन केले.  या घटनेला चार दिवस उलटून देखील मंत्री महोदय गिरीष महाजन अथवा त्यांच्या नजीकच्या कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंचानी पीडीत परीवाराची भेट घेतली नाही अथवा त्यांचे सांत्वन केले नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच जामनेर तालुक्यातील बेटावद या गावी भेट दिली. जवळपास दोन तास या परिवारासोबत त्यांनी घालवले. या परिवारास धीर देत त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन फारुख शेख यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्रात अशा घटना अजिबात घडू नये यासाठी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांना ठोस भूमिका बजवावी लागेल. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना आणि प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मत यावेळी फारुख शेख यांनी व्यक्त केले. नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द राखण्यासह द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या शक्तींना विरोध करण्याचे आवाहन यावेळी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले.

एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्यासह जळगावचे हाफिज रहीम पटेल, मौलाना ओसामा फलाही, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगार, कासिम उमर, अतीक अहमद, आरिफ अजमल तसेच कुर्बान शेख (फैजपूर), इरफान शेठ (चिनावल), अजगर शेख (सावदा), जावेद जनाब (मारुळ – कौमी एकता संघटना), जावेद मुल्लाजी, अशफाक पटेल आसिफ शेख, जुबेर शेख, शकील मुसा, उमर सय्यद (जामनेर) आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment