एलसीबीने उघड केली कंपनीच्या कामगारांची चोरी

On: August 19, 2025 9:40 AM

जळगाव : कंपनीतून काम सोडून गेलेल्या कामगारांनी केलेली चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली आहे.  ओम रामेश्वर पोपटकर (वाघ नगर, जळगाव), रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (कासमवाडी, जळगाव), सागर धर्मेंद्र सपकाळे (वाघ नगर जळगाव) अशी या चोरीच्या गुन्ह्यातील तिघा चोरट्यांची नावे आहेत.   दि. 15 ऑगस्टच्या रात्री जळगाव एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज या कंपनीतून चाळीस हजार रुपये किमतीच्या ऑपरच्या पट्ट्या चोरी झाल्या होत्या. याप्रकरणी व्यवस्थापक बाळु गोवर्धन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ही चोरी कंपनीत काम करणा-या तिघा कामगारांनी केली असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तिघा चोरट्यांच्या मागावर पथक रवाना केले होते. ओम रामेश्वर पोपटकर, रोहित उर्फ रोहन भिकन मराठे आणि सागर धर्मेंद्र सपकाळे या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. पुढील तपासकामी त्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. न्यायालयाने तिघा चोरट्यांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत. अटकेतील तिघा चोरट्यांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment