दिशा बोरनारे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

On: August 20, 2025 9:55 AM

जळगाव (प्रतिनिधी) : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील मूळ निवासी व सध्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नॉर्थ ईस्टर्न युनिवार्सिटी मध्ये डेटा सायन्स मध्ये उच्च पदवी घेणार आहे
सध्या सुरू असलेला ट्रेण्ड, भविष्यातील संभाव्य घटना आणि त्यांचा व्यवसायावर होणारा परिणाम यांच्या आधारे निष्कर्ष व अंदाज काढणे हा डेटा सायन्सचा महत्त्वाचा भाग असून हा अभ्यासक्रम दिशा अभ्यासणार आहे. दिशाच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईतील अनेक शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिशाला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment