क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलीचा विनयभंग

On: September 15, 2020 11:10 PM

मुंबई : मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीतील न्यू म्हाडा वसाहत क्वारंटाईन सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली आहे. सतरा वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. क्वारंटाईन सेंटर मध्ये निर्जंतुक फवारणी करण्यासाठी आलेला

दिपेश सूर्यकांत साळवी या तरुणाने पिडीत मुलीचा हात धरुन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार मानखुर्द पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment