मोटार सायकल चोरटा गजाआड

On: August 21, 2025 11:45 AM

जळगाव : जळगाव शहरातील पांडे चौकातून चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने लावला आहे. अनुराग जाधव असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, स.फौ. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदिप चौधरी, पोकॉ विशाल कोळी आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला. पोलिस नाईक प्रदीप चौधरी व पो.कॉ. विशाल कोळी यांना समजलेल्या माहितीच्या आधारे या चोरीचा तपास लागला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक प्रदिप चौधरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment