जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कारवाया

On: August 24, 2025 10:05 PM

जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वात मोटार सायकलचोरीच्या प्रकरणाच्या तपासासह हद्दपारीतील गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरीच्या तपासात चोरटा अटक करण्यात आला असून त्याच्या कब्जातून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. दुस-या कारवाईत हद्दपारीच्या आदेशाचा अवमान करणा-या गुन्हेगारास हद्दीतून पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळच्या इराणी मोहल्ल्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर  यांच्या पथकातील  पोहेकॉ प्रदिप नन्नवरे, पोहेकॉ शशिकांत पाटील, अंमलदार निलेश घुगे, रविंद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी, गणेश ढाकणे यांच्यासह भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पोहेकॉ रवी नेरकर, अंमलदार प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

दुस-या कारवाईत हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार सागर ऊर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे यास त्याच्या शनीपेठ हद्दीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कारवाईत अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाणे, निलेश घुगे, काजोल सोनवणे आदींच्या पथकाने सहभाग घेतला. या व्यतिरिक्त भुसावळ येथून चोरीस गेलेले दुचाकी वाहन शनिपेठ पोलीस स्टेशनचे हद्दीत बेवारस अवस्थेत मिळून आले. संबंधीत वाहन मालकाचा परिवहन विभाग आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मदतीने शोध घेऊन ते वाहन मुळ मालकास परत देण्यात आले. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पोहेकॉ रवी नेरकर व प्रशांत देशमुख यांनी या शोध कामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment