यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : आगामी गणेश उत्सव, ईद ए मिलाद यासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था नियंत्रण राखण्याकामी घाटंजी पोलिसांतर्फे सोमवारी शहरात पथसंचलन करण्यात आले. घाटंजी पोलिस स्टेशनपासून सुरु झालेले पथसंचलन जुने बस स्थानक, गुप्ते दवाखाना, इंदिरा चौक, मस्जीद लाईन, शिवाजी चौक, अग्रसेन चौक मार्गे पुन्हा घाटंजी पोलिस स्टेशनला पुर्ण झाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पेंढारकर, पोलीस उप निरिक्षक अशोक मडावी, पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलीस उप निरीक्षक सुशिल शर्मा, पोलीस उप निरीक्षक राजेश पंडित, पोलीस उप निरीक्षक विनाश जाधव, पोलीस उप निरीक्षक दुर्गाप्रसाद मिश्रा, पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक रायके, ठाणेदार यांचे रायटर दिनेश जाधव, घाटंजी पोलीस स्टेशन गोपनीय शाखेचे अमोल कोवे यांच्यासह पोलीस उप निरीक्षकासह ८ अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी व २५ होमगार्ड आदींनी यात सहभाग घेतला. सर्व सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक केशवराव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.







