जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. या जबरी चोरीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 288/2025 भा. न्या. संहिता क. 74, 309(4), 115 (2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे 7 मे 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथून त्याला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल यांच्यासह ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, पोकॉ विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पीएसआय मैनुद्दीन सैय्यद, पोकॉ जुबेर शेख आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.





