जुगार अड्डयावर कारवाई – 16 जण ताब्यात, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

On: September 8, 2025 3:40 PM

जळगाव – पाळधी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरील कारवाईत 16 जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा एकुण 12 लाख 24 हजार 260 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये 7 लाख 22 हजार 260 रुपये रोख आणि 5 लाख 2 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. एलसीबी पथक आणि पाळधी दुरक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या या संयुक्त कारवाई प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वातील हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, प्रवीण भालेराव मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रविंद्र चौधरी, पोकॉ रविंद्र कापडणे,  सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गीते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर तसेच पारधी दुरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पो कॉ अमोल धोबी, रविंद्र चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment