भुसावळ खून प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत

On: September 16, 2020 3:31 PM

जळगाव : पुर्व वैमनस्यातून पाच जणांच्या टोळीने रविवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला होता. महामार्ग चौपदरीकरण पुलाच्या बोगद्यात अल्तमश शेख रशीद या तरुणाचा या टोळीने निर्घृण खून केला होता.

या घटनेप्रकरणी सुरुवातीला तिघा हल्लेखोरांना डीवायएसपी गजानन राठोड व पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली होती. त्यानंतर शेख अमीर यास सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.आज भल्या पहाटे पसार झालेला पाचवा आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड याला देखील अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांच्या पथकाला यश आले.

शेख अल्तमश या तरुणाच्या खून प्रकरणी शेख समीर शेख युसूफ, शेख शाहरूख शेख युसूफ, समीर शेख रहेमान शेख, शेख आमीर शेख युसूफ या चौघा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. आता शेवटचा आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड याला देखील अटक झाली आहे.

डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, नाईक रवींद्र बि-हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई पुर्ण केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment