जळगाव : जळगाव शहरातील एसबीआय कॉलनी परिसरातील चढावावर धावत्या ट्रॅक्टरचे संतुलन बिघडल्याने ते उलटल्याची घटना घडली. या घटनेत चालक ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून तो जगण्याची धडपड करत आहे. या जीवघेण्या अपघातात ट्रॅक्टरमधे बसलेल्या दुस-याने उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.
गणेश चव्हाण (भैरव बाबा नगर) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.कॉ. योगेश माळी यांनी धाव घेतली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. अधिक तपास सुरु आहे.







