जुगार अड्ड्यावर छापा – सात जण अटकेत

On: September 12, 2025 9:17 PM

जळगाव – कासोदा पोलिसांनी टाकलेल्या जुगार अड्ड्यावरील छाप्यात सात जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. ३३८० रुपये रोख, २२००० रुपये किमंतीचे मोबाईल व १,४०,०००/- रुपये किमतीच्या तीन मोटार सायकल असा एकुण १,६६,०३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल या छापा कारवाईत जप्त करण्यात आला आहे. कासोदा गावानजीक बांभोरी शिवारातील गालापूर रस्त्यावर एका शेतात जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 

शेख फारुख शेख नबी, शेख शहीद शेख रफिक, शेख निजाम शेख सिराज, तस्लीम सुलेमान खान, शेख हमीद शेख शौकत, शेख हमीद शेख अमीर, शेख मुस्ताक खान अमीर खान (सर्व रा. कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या सात जुगारींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या पथकातील पोलीस नाईक अकिल मुजावर, पोकॉ समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment