अल्पवयीन विवाहीता गर्भवती – पतीविरुद्ध गुन्हा

On: September 13, 2025 10:31 AM

जळगाव : अल्पवयीन विवाहीता गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या पतीविरुद्ध मारवड (अमळनेर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदर मातांची नोंदणी सुरु असतांना आशा वर्कर महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. आशा वर्कर महिलेने धुळे जिल्ह्यातील या सोळा वर्षाच्या गरोदर अल्पवयीन मुलीला धुळे येथील सर्वोपचार केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता अधिकची माहिती उघड झाली.

अल्पवयीन गर्भवती मुलीचे तिच्या आई-वडिलांनी सुमारे एक वर्षापूर्वी अमळनेर तालुक्यातील तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले होते. आशा वर्कर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे येथील मोहाडी पोलिस स्टेशनला याप्रकरणी विविध कलमाखाली रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. मोहाडी पोलिस स्टेशनमधून हा गुन्हा मारवड पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक विनोद पवार करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment