साडे बारा हजार पदांची होणार पोलीस भरती

On: September 16, 2020 6:35 PM

मुंबई : राज्यात पोलीस भरती होणार असून साडे बारा हजार पदे भरली जाणार आहेत. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सदर पोलीस भरती शहरी व ग्रामीण तरुण, तरुणींसाठी राहणार आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर गृह मंत्री देशमुख यांनी दिली आहे.

राज्याच्या पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विट द्वारे दिली होती. आज मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर अखेर पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment