पाचशे रुपयांच्या मोहात तीने पत्करला मार्ग वाम — पोलिस तपासात पुढे आले तिघांचे घृणास्पद काम 

On: September 18, 2025 12:34 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपला रोजगार टिकवून ठेवणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे बहुसंख्य श्रमीक वर्गातील पालकांना आपल्या मुला मुलींकडे सातत्याने लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे सोळा वर्षाच्या काही अल्पवयीन मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता निर्माण होत असते. बरेच पालक त्यांचा रोजगार टिकवून ठेवण्यात व्यस्त असतांना तारुण्याच्या उंबरठ्यावरील काही अल्पवयीन मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता असते. कुमारवयातून तारुण्यात पदार्पन करणा-या सोळा – सतरा वर्षाच्या मुली मोहाला सहजासहजी बळी पडतात हे बदमाशांना चांगल्याप्रकारे माहिती असते. अशा कोवळ्या वयातील मुलींना सावजाच्या रुपात हेरुन त्यांच्या यौवनाचा गैरफायदा घेऊन कमाई करणारे महाभाग या समाजात असतात. जळगाव शहरातील अल्पवयीन रोहीणी (काल्पनिक नाव) या मुलीच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला. या घटनेचे सत्य बाहेर आले आणि बदमाशांचे त्रिकुट गजाआड झाले. जळगाव शहरातील या घटनेचा वृत्तांत पुढीलप्रमाणे….  

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेली सोळा वर्षाची रोहीणी दिसायला देखणी होती. जळगाव शहरात राहणा-या रोहीणीला तिन बहिणी होत्या. रोहीणी चौथ्या क्रमांकाची सर्वात धाकटी होती. रोहीणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तिच्या पालणपोषणाची सर्वस्वी जबाबदारी ओघाने तिच्या आईकडे आली होती. मोलमजुरी करुन रोहिणीच्या आईने दोन मुलींचे विवाह पार पाडले. त्यानंतर उर्वरीत दोन मुलींचे ती पालणपोषण करत होती.        

एके दिवशी रोहीणी जळगाव शहरातील स्टेडीयम कॉम्पलेक्स परिसरात काही कामानिमीत्त आली. त्यावेळी तिची ओळख तुकारामवाडी परिसरात राहणा-या एका तरुणीसोबत झाली. ओळखी नंतर दोघींनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक शेअर केले. तुकाराम वाडी परिसरात राहणा-या त्या तरुणीने रोहीणीसोबत जाणीवपुर्वक मैत्रीचे जाळे फेकले आणि मैत्री घट्ट केली. ती तरुणी कायम रोहीणीच्या संपर्कात राहू लागली. रोहीणीच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे छंद काय आहेत, तिला खाण्यास काय आवडते या सर्व गोष्टी त्या तरुणीने समजून घेतल्या. त्यातून रोहीणी आणि ती तरुणी यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघी मैत्रीणी एकमेकांना सातत्याने भेटू लागल्या. तुकारामवाडी परिसरात राहणारी ती तरुणी रोहीणीसोबत प्रेमाने गोड बोलत असे. मात्र तिच्या या मैत्रीमागे दडली होती एक बदमाशी.

रोहीणी सोळा वर्षाची होती. ती तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. अशा मुली वयाने, शरीराने आणि मनाने परिपक्व नसतात. भुलथापा दिल्या म्हणजे रोहीणीसारख्या सोळा वर्षाच्या मुलींचे पाऊल वाकडे पडण्यास वेळ लागत नाही, त्या क्षणात मोहाच्या जाळ्यात फसतात. अशा मुलींच्या माध्यमातून आपला फायदा कसा करायचा हे त्या बदमाश तरुणीला चांगल्याप्रकारे माहिती होते.

रोहीणीच्या मनमिळाऊ आणि साध्या स्वभावाचा फायदा घेत त्या तरुणीने तिच्यासोबत चांगलीच जवळीक साधली. एके दिवशी त्या तरुणीने रोहीणीला म्हटले की त्या तरुणीने रोहिणीला कॉल केला. मैत्रीणीचा कॉल आल्याने रोहीणीने तो उचलला. पलीकडून बोलणा-या त्या तरुणीने रोहीणीला म्हटले की माझी एक मैत्रीण आहे. ती मैत्रीण जळगाव शहरातील कोल्हे नगर भागातील शंभर फुटी रस्त्यावर राहते. तु माझ्या त्या मैत्रीणीच्या घरी येशील का? तिच्या घरी तुला चांगले काम मिळेल आणि त्या कामातून तुला चांगले पैसे देखील मिळतील असे रोहीणीला तिच्या मैत्रीणीने सांगितले. मोह हे दुखा:चे कारण असते हे समजण्याइतपत रोहीणीचे वय नव्हते. या कोवळ्या वयात नादान मुली आमिषाला बळी पडून स्वत:चे आणि परिवाराचे नुकसान करुन घेत असतात. ज्यावेळी आपली विचारशक्ती काम करत नाही त्यावेळी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे उचीत असते. आपल्या पालकांनाच एक्स्पर्ट अ‍ॅडव्हायजर समजून त्यांच्याजवळ आपली समस्या मांडली तर बरेच प्रश्न सुटू शकतात. मात्र या वयातील मुले मुली परक्यांच्या अमिषाला बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले नुकसान करुन घेत असतात. रोहीणीच्या बाबतीत देखील असेच झाले. तिने तिच्या मैत्रीण म्हणवणा-या त्या तरुणीच्या बोलण्यावर विश्वास आणि आमिषाला बळी पडून तिच्यासोबत जाण्याचा मार्ग पत्करला.

मैत्रीणीच्या घरी जात असल्याचे सांगून रोहीणी घराबाहेर पडली होती. ठरल्याप्रमाणे रोहीणी आणि तिची ती मैत्रीण अशा दोघी जणी जळगाव शहरातील पांडे चोकात एकमेकींना भेटल्या. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. रोहीणी आणि तिची तुकारामवाडीतील मैत्रीण अशा दोघी पांडे चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या होत्या. त्याचवेळी ठरल्यानुसार त्यांच्याजवळ एक पांढ-या रंगाची कार आली. त्या कारमधे एक महिला व चालकाच्या रुपात पुरुष विराजमान होता. कारमधील महिलेचे नाव सरला सतिष पाटील तर चालकाचे नाव सतीष सुभाष पाटील असल्याचे रोहीणीला समजले. चालक सतिष पाटील यास सर्वजण मनोज दादा या नावाने ओळखत असल्याचे आणि तो सरला पाटील हिचा पती असल्याचे रोहीणीला समजले.

त्या कारमधे रोहीणीला बसवून तिची मैत्रीण निघून गेली. त्यानंतर रोहीणी त्या दोघांसोबत कोल्हे हिल्स परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात आली. रात्र बरीच झाली असल्याने रोहीणी तेथेच झोपून गेली. सकाळी सरला व मनोज या दोघांनी रोहीणीला तिच्या कामाचे स्वरुप समजावून सांगितले. याठिकाणी तुला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शरीरसंबंध प्रस्थापीत करावे लागतील, या कामाचे आम्ही तुला चांगले पैसे देऊ असे तिला दोघांकडून सांगण्यात आले. घरातून आईसोबत वाद घालून आलेल्या अल्पवयीन रोहीणीने त्यांच्या या प्रस्तावाला आणी पैशांच्या मोहाला बळी पडून होकार देऊन टाकला.

त्याच दिवशी त्या बंगल्यात दोन ग्राहक आले. या दोघांसोबत अल्पवयीन रोहीणीचे क्रमाक्रमाने शरीरसंबंध निर्माण झाले. कुमारवयात रोहीणी शरीरसंबंधाच्या प्रसंगाला प्रथमच सामोरी गेली. या कामाचे तिला दोघा ग्राहकांकडून प्रत्येकी पाचशे असे एकुण एक हजार रुपये मिळाले. वाममार्गाने निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अल्पवयीन रोहीणीने केलेली तिची ही पहिली कमाई होती. केवळ एक हजार रुपयात तिने आपले शिल भ्रष्ट केले होते. तिच्यासाठी एक हजार रुपये ही रक्कम फार मोठी असली तरी ज्या दोघांनी तिचे शिल भ्रष्ट केले त्यांच्यासाठी ती किरकोळ रक्कम होती. प्रत्येकी पाचशे रुपयात ग्राहक असलेल्या दोघांनी तिच्या शरिराला भोगून आनंद लुटला होता. या घटनेनंतर तिची मैत्रीण त्या बंगल्यात आली. तिने रोहीणीला रिक्षाने तिच्या घराजवळ सोडून दिले आणि ती एकटीच पुढे तिच्या घरी निघून गेली.

त्यानंतर जवळपास दहा दिवसांनी रोहीणीला तिची मैत्रीण पुन्हा त्याच बंगल्यात घेऊन गेली. यावेळी देखील त्याठिकाणी दोन ग्राहक आलेले होते. यावेळी रोहीणीला त्या ग्राहकांच्या माध्यमातून सरलाच्या हस्ते प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे एकुण एक हजार रुपये मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिला तिची मैत्रीण त्या बंगल्यात घेऊन गेली. यावेळी देखील अशाच प्रकारे रोहीणीला दोघा ग्राहकांच्या माध्यमातून सतिषच्या हस्ते एकुण एक हजार रुपये मिळाले.

यावेळी काम आटोपल्यानंतर रोहीणी घरी परत आली. या दिवशी तिचे तिच्या आईसोबत काहीतरी कारणावरुन वाद झाला होता. या वादातून संतापाच्या भरात रोहीणी कुणाला न सांगता सरळ भुसावळ येथे तिच्या दुस-या मैत्रीणीकडे निघून गेली. आपली मुलगी आपल्याला न सांगता कुठे गेली या विचाराने तिची आई हवालदिल झाली. तिच्या आईने रात्रीच जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. जिल्हापेठ पोलिसांनी लागलीच तिच्या मोबाईलचे लोकेशन काढून ती कुठे आहे याचा शोध घेतला. या कालावधीत ती भुसावळ येथून पुन्हा कोल्हे हिल्स परिसरातील त्या बंगल्यात आली होती.

त्याचवेळी त्याठिकाणी जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक दाखल झाले. त्यांनी तिला ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. पोलिस पथकाने तिची सखोल चौकशी केली. मात्र तिने जिल्हापेठ पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही. मी माझ्या मर्जीने कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्यात गेली होती असे तिने सांगितले. मात्र तिने तिच्या आईसोबत घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बाल कल्याण समितीकडे दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान केली ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. याच कालावधीत कदाचीत तिने कोणत्यातरी गोळ्या घेतल्या असाव्यात. त्यामुळे तिची पाळी देखील आली आणि रक्तस्त्रावासह तिचा गर्भ गळून पडला. त्यानंतर तिला आशादीप महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले.  

अल्पवयीन रोहीणीसोबत झालेला अतिप्रसंगाचा प्रकार हा रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील कोल्हे हिल्स परिसरातील एका बंगल्यात झाला असल्याचे जिल्हापेठ पोलिस स्टेशन पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे अल्पवयीन रोहीणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. तिची आई, उपस्थित डॉक्टर, आशादीप वस्तीगृहाच्या अधिकारी आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उप निरीक्षक माधुरी बोरसे आदींच्या समक्ष तिचा जवाब व फिर्याद नोंदवण्यात आला. गु.र.नं. 325/25 भारतीय न्याय संहीता 2023 नुसार कलम 64 (2) (एम), 64, 143 (4), 144, 74, 3 (5), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12, पिटा अधिनियम 3, 4, 5 नुसार हा गुन्हा रामानंद नगर पोलिस स्टेशनला सरला सतिष पाटील, सतीष सुभाष पाटील व तुकारामवाडी परिसरातील तरुणी अशा तिघांविरुद्ध दाखल करण्यात आला. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला. पोलिस उप निरीक्षक संदिप पाटील यांनी तातडीने तपासचक्रे फिरवत या गुन्ह्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात यश मिळवले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment