जळगाव – विक्रीसाठी आणलेल्या 18 तलवारींसह एकास पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना समजलेल्या माहितीच्या आधारे 18 सप्टेंबर च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई यशस्वी करण्यात आली. सोहेल शेख तय्युब शेख (रा. स्मशान भुमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा, जि. जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अटकेतील सोहेल शेख याने 54 हजार रुपये किमतीच्या 18 तलवारी त्याने लपवून ठेवलेल्या जागेवरून हस्तगत करण्यात आल्या. पाचोरा पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गु.र.क्रमांक 460/25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी कृष्णा घायाळ, पोउपनिरी कैलास ठाकुर, पोकॉ संदिप राजपुत, पोकॉ जितेंद्र पाटील, हरीष परदेशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







